महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२२। बुलडाणा । राज्यभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. दिवसेंदिवस कोरोनाचे अधिक संख्येने रुग्ण मिळू लागलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून शेगावचं गजानन महाराज मंदिर भाविकासांठी बंद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे भाविकांना आता इथून पुढचे काही दिवस दर्शन घेता येणार नाही. (Shegaon Gajanan Maharaj Mandir Closed Over Corona Virus)कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यांतल्या अनेक मोठ्या शहरांत पाहायला मिळतो आहे तसा तो ग्रामीण भागांत देखील पाहायला मिळतोय. विदर्भात तर कोरोनाने गेल्या 10 दिवसांपासून कहर केला आहे. यवतमाळ, अकोला, नागपूर या भागांत कोरोनाचे अधिक रुग्ण मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण विदर्भ प्रशासन अलर्ट मोडवर गेलं आहे. गर्दीच्या ठिकाणांवर प्रशासनाने निर्बंध लादले आहेत. त्याचमुळे इथून पुढचे काही दिवस गजानन महाराज मंदिर भाविकासांठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
सद्यस्थितीत राज्यभरात कोरोना विषाणूचाा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने विभागीय आयुक्त अमरावती तसंच जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या निर्देशानुसार गजानन महाराजांचे मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणं शक्य नसल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 21 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येईल.पुढील आदेशापर्यंत श्रींच्या दर्शनासाठी भाविकांना बंदी करण्यात आलीय. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करीत संस्थानने घेतला निर्णय असल्याचं संस्थान प्रशासनाने सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व अटी-नियमांचं पालन संस्थान करत असल्याचंही संस्थान प्रशासनाने सांगितलं आहे.
पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिरंही दोन दिवस बंद
विठ्ठल रुक्मिणीमातेचे मंदिर आज आणि उध्या राहणार बंद आहे. कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर यंदाची माघी यात्रा रदद् केली आहे. उद्या माघी एकादशी असल्याने मंदिर आज आणि उध्या मंदिर राहणार बंद राहणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी दिली.