वाढत्या कोरोनामुळे पुण्यात कठोर नियमावली

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२२। पुणे । राज्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यांनुसार आता कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू झाले आहेत. अमरावती, वर्ध्यानंतर आता पुण्यातही कोरोना वाढू नये म्हणून कठोर पावलं उचलण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. पुण्यासह ग्रामीण भागांमध्ये कोरोनासंदर्भात मोठ्या प्रमाणात जगजागृती वाढवणार आहे. याशिवाय पुणे विभागातील कोरोना हॉटस्पॉट निश्चित करून तिथे सर्वेक्षण वाढवण्यावर भर देण्यात येईल. पुण्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही कठोर निर्णय़ घेण्यात येत आहेत.

पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन 28 तारखेपर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. त्याशिवाय कॉलेजेस, खासगी कोचिंग क्लासेसही बंद राहणार आहेत. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिका 50 टक्के क्षमतेनं सुरू राहणार आहेत. पुण्यातील हॉटेल्स, बार, रेस्टोरेंट आता फक्त राञी 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. याशिवाय रात्री 11 वाजेपासून ते सकाळी 6 पर्यंत अनावश्यक फिरण्यावर बंदी आहे. लग्नसमारंभ, संमेलन, खासगी कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम यावर निर्बंध घालण्यात आले असून फक्त 200 लोकांना यात सहभागी होण्याची परवानगी असेल. तर लग्न समारंभासाठी आता पोलिसांची परवानगी अत्यावश्यक असणार आहे अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *