उद्या खेळणार पहिली टी-२० मॅच ; IPL लिलावानंतर १५ कोटींचा खेळाडू

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२१।ख्राइस्टचर्च । नुकत्याच झालेल्या आयपीएल २०२१च्या लिलावात न्यूजीलंडचा वेगवान गोलंदाज कायले जेमिन्सन (kyle jamieson) हा चर्चेत आला. यंदाच्या हंगामासाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात अनपेक्षितपणे जेमिन्सन केंद्रबिंदू ठरला. ७५ लाख बेस प्राइस असलेल्या जेमिन्सला तब्बल १५ कोटी इतकी बोली लागली. आयपीएलच्या १४व्या हंगामातील तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महाग खेळाडू ठरला आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दांडगा अनुभव नसला तरी जेमिन्सनला यावेळी लिलावात १५ कोटी रुपये मिळाले. आरसीबीच्या संघाने ग्लेन मॅक्सवेलपेक्षा जास्त पैसे मोजत जेमिन्सनला आपल्या संघात स्थान दिले आहे. आता एप्रिल महिन्यात होणाऱ्या आयपीएलमध्ये तो कशी कामगिरी करतो यावर सर्वांची नजर असलेच. पण त्याआधी उद्यापासून होणाऱ्या टी-२० मालिकेत तो कशी कामगिरी करतो याकडे असेल.

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्यापासून पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने या दोन्ही संघांच्या सरावाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत . कायले जेमिन्सनने आतापर्यंत फक्त ४ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने फक्त ३ विकेट घेतल्या आहेत. आयपीएलच्या आधी होणाऱ्या सामन्यात तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांची नजर असेल. उद्यापासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तो कशी गोलंदाजी करतो याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांसोबत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला देखील असेल.

या मालिकेत न्यूझीलंडचे नेतृत्व केन विलियमसन तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व अरॉन फिंच करणार आहे. न्यूझीलंडने काही दिवसांपूर्वी टी-२० साठी नवी जर्सी लॉन्च केली आहे. या नव्या जर्सीत न्यूझीलंडचे खेळाडू मैदानावर दिसतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *