महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२१। मुंबई । पेट्रोलच्या किंमती दिवसागणिक वाढतच आहेत. सर्व सामान्यांना रडवत आहेत. मुंबई आणि दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 90 रुपयांच्या पुढे पोहोचली आहे. दुसरीकडे, कच्च्या तेलाची किंमतही वाढत आहे. बेंचमार्क क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल 65 डॉलरवर गेली आहे. मध्य प्रदेशात अवस्था बिकट आहे. प्रीमियम पेट्रोलनंतर साधे पेट्रोलही 100 रुपयांच्या पुढे गेले आहे. अनूपपूर जिल्ह्यातील साधे पेट्रोल सर्वात महाग झाले आहे.
Okinawa : भारतातील स्वस्त आणि सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून ओकिनावाकडे पाहिले जाते. Ridge ही पहिले इलेक्ट्रिक स्कूटर आहे. त्याचा वेग ताशी 60 किमी आहे. बाजारात त्याची किंमत 44,990 रुपये आहे. स्कूटरचे वजन 96 किलो आहे.
Ampere – भारतातील स्वस्त आणि सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रिक स्कूटरः अँपियरची 48 V-24Ah ची बॅटरी चार्ज होण्यासाठी सुमारे 8 ते 10 तासांचा कालावधी घेते. ही स्कूटर ताशी 25 किमी वेगाने धावू शकते. पूर्ण चार्ज झाल्यानंतर 45 ते 50 किमी पर्यंत जाऊ शकते. भारतीय बाजारपेठेतील त्याची किंमत 28,900 ते 37,488. रुपयांपर्यंत आहे. हे काळ्या, लाल आणि ग्रे रंगात उपलब्ध आहे.
Bajaj Chetak – बजाज चेतकने इलेक्ट्रिक स्कूटर आणत बाजारात पुन्हा एन्ट्री केली आहे. आत्ता बजाज चेतकची ही इलेक्ट्रिक स्कूटर केवळ निवडक शहरांमध्ये उपलब्ध आहे. बजाज चेतकमध्ये 3kWh, लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. ही स्कूटर सिंगल चार्ज केल्यानंतर 95km पर्यंतची जाऊ शकते. या स्कूटरची 1 लाख रुपयांपासून सुरू होते.
हिरोच्या ऑप्टिमा स्कूटरला पूर्ण चार्जिंग होण्यासाठी 8 ते 10 तास लागतात. या स्कृटरचा वेग ताशी 25 किमी आहे. सिंगल चार्जमध्ये स्कूटर 50 किमीपर्यंत धाऊ शकते. ही तीन रंगात उपलब्ध आहे. मॅट रेड, निळा आणि मॅट ग्रे रंगात बाजारात उपलब्ध आहेत. स्कूटरला 250W क्षमतेची बीएलडीसी इलेक्ट्रिक मोटर आहे. याची किंमत 41,770 रुपये आहे.
TVS इलेक्ट्रिक स्कूटर एकदम चांगली आहे. यात आपल्याला 4.4 किलोवॅट क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर मिळते. याव्यतिरिक्त, ही स्कूटर पूर्ण चार्जिंगमध्ये सुमारे 75 किमी चालते. हीचा ताशी 78 किमी वेग आहे. याव्यतिरिक्त, 6 बीएचपीची शक्ती आणि 140 एनएमची टॉर्क जनरेट करते. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर भारतीय बाजारात त्याची किंमत सुमारे 1.15 लाख रुपये आहे. 4.2 सेकंदात ताशी 40 km किमी वेग घेते.