देशातल्या अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पार , पहा तुमच्या शहरातले आजचे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२५। मुंबई । गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये (Petrol Diesel Price Today 25 February) सातत्याने वाढ होत आहे. देशातल्या अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पार गेल्या आहेत. गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनेक पटींनी वाढ झाली. दररोज 30 पैशांपर्यंत वाढ झाल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाली पण बुधवारी आणि आज गुरुवारीही दरांमध्ये फारसे बदल झालेले दिसले नाहीत. (petrol diesel price today 25 February 2021 know the new rate of chennai mumbai and kolkata)

आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गुरुवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत 35 पैशांची वाढ झाली तर डिझेलच्या किंमतीही 35 पैशांनी वाढल्या. खरंतर, तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात. दिल्लीबद्दल बोलायचं झालं तर गुरुवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत 90.93 वर पोहोचली आहे. मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 97.34 रुपये आहे. एकंदरीतच मेट्रो शहरांमध्ये इंधनाचे दर सर्वाधिक आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आत्तापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे.

प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.93 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.34 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 91.1 2रुपये प्रति लिटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 92. 90 रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.32 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.44 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.20 रुपये प्रति लिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 86.31 रुपये प्रति लिटर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *