जयललिता यांच्या भूमिकेतून कंगना राणौत करणार राजनीती, या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी -मुंबई – दि. २५ – बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना राणौत लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. तिचा बहुप्रतीक्षित चित्रपट थलाइवी २३ एप्रिलला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी जयललिला यांच्या ७३व्या जयंतीच्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्यांचा जीवन प्रवास उलगडणार आहे. या चित्रपटात कंगना जयललिता यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

या वृत्ताला दुजोरा देत कंगना राणौतने लिहिले की, जय अम्मा यांच्या जयंतीला…२३ एप्रिल, २०२१ ला चित्रपटगृहात दिग्गज व्यक्तीच्या कथेचा साक्षीदार बना. थलाइवी हिंदी, तमीळ आणि तेलगू या भाषेत रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए. एल. विजयने केले आहे आणि यात अरविंद स्वामी, प्रकाश राज, मधू आणि भाग्यश्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात जयललिता यांचा अभिनयाच्या कारकीर्दीपासून राजकीय प्रवास रेखाटण्यात आला आहे.

कंगना राणौतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्यांचा थलाइवी चित्रपट रिलीजसाठी तयार आहे. याशिवाय सध्या ती धाकडच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. यात ती सीक्रेट सर्विस एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती तेजस आणि मणिकर्णिका रिटर्न्समध्ये झळकणार आहे.कंगनाचा आगामी चित्रपट धाकडमध्ये अर्जुन रामपाल निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. तर दिव्या दत्तादेखील दिसणार आहे. या दोघांचा चित्रपटातील लूक समोर आला आहे. हा चित्रपट यावर्षी १ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *