जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, शिक्षणमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24। विशेष प्रतिनिधी । दि.२६। मुंबई । राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढायला सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कडक निर्बंध लादण्यात येत आहेत. तसेच, जिल्ह्याचे पालकमंत्री बैठका घेऊन कारवाईसाठी योजना आखताना दिसत आहेत. अनेक जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात आज दिवसभरात तब्बल 8,807 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस हा आकडा वाढताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांपेक्षा अधिक होता. मात्र, तो आता कमी झाला आहे. राज्यात गेल्या आठवडाभरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी दिवसभरात तब्बल 8,807 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी वाढलेल्या रुग्णांची संख्या 6 हजारांपेक्षा जास्त होती, तर सोमवारी दिवसभारत 5,210 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली होती. त्यामुळे, रुग्णांची वाढती संख्या लक्षात प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अनेक जिल्ह्यांत 7 मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तर, आरोग्यमंत्र्यांनीही विद्यार्थ्यांना पत्र लिहून भावनिक साद घातली आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना शाळा सुरु ठेवण्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. ”राज्यातील काही जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार दि. १ मार्च २०२१ पासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश देण्यात येत आहेत, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. शिक्षणमंत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *