आता पाठ्यपुस्तकं विकत घेण्याची गरज नाही, शिक्षणमंत्री (Minister of Education) डॉ. रमेश पोखरियाल निशंक, केली महत्त्वाची घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. २६ – शिक्षणमंत्री (Minister of Education) डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी नवोदय विद्यालय कार्यकारिणीची चाळीसावी बैठक घेतली. यात शिक्षण व्यवस्थेबद्दलचे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात ईशान्य, हिमालयीन विभाग आणि जम्मू काश्मीरसाठी विशेष भरती मोहिम तसंच नववी नंतरच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गोळ्या यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजेच इयत्ता 6 ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थांना आता मोफत पाठ्यपुस्तकं (Free text books) उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. ही नवीन शैक्षणिक धोरणे पुढील वर्षीपासून राबवण्यात येणार आहेत.

वसतिगृहे आणि शाळांच्या सुधारणांसाठी सीएसआर (CSR) निधी जमा करावा लागेल तसंच माजी विद्यार्थ्यांना शाळेसाठीच्या सोयीसुविधा तसंच इतर गरजांकडं लक्ष देण्याची विनंती केली जाईल. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनीही या बैठकीला हजेरी लावली होती. यावेळी शांळांमधील पायाभूत सुविधांमध्ये प्राधान्यानं सुधारणा होणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोबतच कोरोनाच्या दृष्टीनं योग्य ती खबरदारी घेणं आणि डिजीटल शिक्षणाचा प्रसार करुन याच्या गुणवत्तेकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *