कोकण किनारपट्टीवर वादळी वा-यांचा तडाखा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २६ – कोकण किनारपट्टीवर बसलेला वादळी वा-यांचा तडाखा आणि पौर्णिमेमुळे आलेल्या उधाणाच्या भरतीमुळे मिरकरवाडा बंदरावर जोरदार लाटांनी थैमान घातले. त्यातच खवळलेल्या समुद्राच्या पाण्यात प्रवाह निर्माण झाल्याने बंदरावर उभ्या असणा-या नौकाचे दोरखंड तुटले. यामुळे नौका एकमेकांवर आदळल्याने मच्छीमारांचे नुकसान झाले आहे.

‘नानौक’ वादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीवर बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. परंतु, वादळ पुढे सरकल्याने कोकण किनारपट्टीवर त्याचा परिणाम जाणवला नसला तरी, समुद्र खवळलेला होता. त्यातच पौर्णिमा असल्याने समुद्राला उधाणाची भरती आली होती.त्यामुळे मिरकरवाडा, मि-या आदी परिसरात उधाणाच्या भरतीमुळे लाटांनी थैमान घालण्यास सुरुवात केली. गणपतीपुळे येथेही मंदिराच्या संरक्षक भिंतींना लाटांचे जोरदार तडाखे बसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *