राज्यात दहावी आणि बारावी बोर्डाचे वेळापत्रक जाहीर

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24। विशेष प्रतिनिधी । दि.२७। पुणे । राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं (Maharashtra state board) वेळापत्रक जाहीर झालं आहे. दहावी बोर्डाची लेखी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या दरम्यान घेतली जाणार आहे. तर बारावी बोर्डाची लेखी परीक्षा ही 23 एप्रिल ते 21 मे 2021 या कालावधीत होणार आहे.

कोरोनामुळे यंदाच्या वर्षी (HSC and SSC board exam) परीक्षा कशी होणार याबाबत अजून माहिती पुढे आलेली नाही. राज्य शिक्षण मंडळाकडून परीक्षेच्या फक्त तारखा जाहीर करण्यात आल्या. यावर्षी कोरोनामुळे विविध मंडळांच्या परीक्षा उशीर होणार असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संकेत दिले होते.

तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा कधी होणार हे शाळा आणि कॉलेजांना परीक्षेच्या आधी कळविण्यात येणार आहे. बोर्डाने इतर कोणत्याही वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर अधिकृत माहिती जाहीर केली जाईल. सोशल मीडियावर व्हायरल वेळापत्रकारवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पालकांना आणि विद्यार्थ्यांना करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *