दिल्ली सरकार 2000 इलेक्ट्रिक गाड्या विकत किंवा भाड्याने घेणार , केजरीवाल यांचे आदेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. २६ -दिल्ली सरकारच्या सर्व विभागांमध्ये आता फक्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आदेश दिले आहेत.दिल्लीच्या अर्थमंत्रालयाने आदेश जारी केला आहे. राज्य सरकारने इलेक्ट्रिक वेहिकल 2020 लागू केले असून पुढील सहा महिन्यात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीवर चालणारी वाहने बदलून इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इलेक्ट्रिक वाहने विकत घेण्यासाठी किंवा भाडेतत्वावर घेण्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आली आहे. दिल्ली सरकार 2000 इलेक्ट्रिक गाड्या विकत किंवा भाड्याने घेणार आहेत.

इलेक्ट्रिक वाहने विकत घेण्यासाठी किंवा भाड्याने घेण्यासाठी जेम पोर्टल किंवा हिंदुस्थान सरकारच्या उर्जा विभागाअंतर्गत येणार्‍या EESL चा उपयोग होणार आहे.

या अभियानाअंतर्गत पहिल्या दोन आठवड्यांत दुचाकी आणि तीन चाकी वाहन चालकांना इलेक्ट्रिक वाहने घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. तिसर्‍या आठवड्यात चार चाकी वाहन मालकांना प्रोत्साहन दिले जाईल. ऑगस्ट 2020 पर्यंत दिल्लीत सहा हजार इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. दिल्लीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्याने पर्यावरण हानी कमी होईल असा विश्वास दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *