महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २७ – मुंबई – महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त आहे. तीन दिवसांच्या दिलासा दिल्यानंतर पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol, Diesel Price Increased) वाढविण्यात आले आहेत. आजच्या किंमतींपूर्वी देशात पेट्रोल आणि डिझेल इतका महाग कधीच नव्हता. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम इतर सेवांवरही होतो.
आज दिल्लीत पेट्रोल २६ पैशांनी महाग झाले आहे आणि प्रतिलिटर ९१ रुपये इतकी किंमत पार केली आहे. दिल्लीत पेट्रोल आज प्रतिलिटर ९१.१७ रुपये आहे. जे आतापर्यंतचे सर्वात जास्त दर आहेत. मुंबईतही पेट्रोल १३ पैशांनी महाग झाले आहे तर ९७.४७ रुपये प्रतिलिटर झाले आहे. कोलकातामध्ये पेट्रोल आज प्रति लिटर ९१.३५ रुपये आणि चेन्नईमध्ये पेट्रोल ९३.१७ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. काय आहेत आजचे पेट्रोल दर जाणून घेऊया.
राज्य कालचे दर आजचे दर
दिल्ली – ९०.९३ ९१.१७
मुंबई – ९७.३४ ९७.४७
कोलकता – ९१.१२ ९१.३५
चेन्नई – ९२.९० ९३.१७
या वर्षात २६ वेळा वाढले पेट्रोल-डीझेलचे दर
यावर्षी आतापर्यंत पेट्रोलच्या दरात २६ पटीने वाढ झाली आहे. यावर्षी १ जानेवारीला दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर ८३.७१ रुपये होती, जी आता ९१ रुपयांच्या पुढे गेली आहे. एकूणच पेट्रोल ७ रुपये ४६ पैशांनी वाढले आहे.
डीझेलच्या दरामुळे महागाईत वाढ
पेट्रोल नंतर डिझेलच्या वाढत्या दराबद्दल बोलूया. मुंबईत डिझेल प्रति लिटर ८८.६० रुपये आहे, जो आतापर्यंतचा सर्वात महाग दर आहे. दिल्लीत डिझेल प्रति लिटर ८१.४७ रुपये आहे. कोलकतामध्ये हा दर प्रति लिटर ८४.३५ रुपये आहे तर चेन्नईमध्ये डिझेलचा दर प्रतिलिटर ८६.४५ रुपये आहे. काय आहेत आजचे डीझेल दर जाणून घेऊया.
राज्य कालचे दर आजचे दर
दिल्ली – ८१.३२ ८१.४७
मुंबई – ८८.४४ ८८.६०
कोलकता – ८४.२० ८४.३५
चेन्नई – ८६.३१ ८६.४५
कसे पाहायचे पेट्रोल आणि डिझेलचे दर
तुम्ही SMS द्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील पाहू शकता. इंडियन ऑईल IOC ने आपल्याला सुविधा दिली आहे की, आपण आपल्या मोबाइलमध्ये आपल्या शहराचा कोड आरएसपी (RSP) लिहून या 9224992249 क्रमांकावर SMS पाठवा. तुमच्या मोबाईलवर त्वरीत आपल्या शहराचा पेट्रोल-डीझेल दर तुम्ही पाहू शकता. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो जो IOC आपल्याला त्याच्या वेबसाइटवर देतो.