अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली, ब्लॉग शेअर करत म्हणाले…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – मुंबई -बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. ते आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काही कविता, फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच अमिताभ बच्चन यांनी एक ब्लॉग शेअर केला आहे. तो ब्लॉग बघितल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (Amitabh Bachchan shared a blog about medical condition and surgery Informed)

खुद्द बिग बीने चाहत्यांना बिघडलेल्या तब्येतीची माहिती दिली आहे. शस्त्रक्रियेची माहिती देखील त्यांनी ब्लॉगमध्ये शेअर केली आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, मेडिकल कंडिशन, शस्त्रक्रिया, मी लिहू शकत नाही, त्यांच्या अशाप्रकारच्या ब्लॉगमुळे चाहते चिंतेत आले आहेत. मात्र, शस्त्रक्रिया झाली की, होणार हे समजू शकले नाही.

आता अमिताभ बच्चन यांचे चाहते त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या बहुचर्चित झुंड चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. आणि चित्रपटाची रिलीज तारीखही जाहिर केली होती. हा चित्रपट 18 जूनला प्रदर्शित होणार असल्याचे बिग बीने सांगितले होते. बिग बी हे एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत.

झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा शिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या चित्चीरपटाची कथा आहे. सत्यकथेवर आधारित हा चित्रपट आहे. नागराज मंजुळेने या चित्रपटाची स्क्रीप्ट लिहिण्यासाठी सुमारे दोन वर्ष वेळ घेतला. बिग बी अमिताभ बच्चन यांना नजरेसमोर ठेवूनच नागराजने ही स्क्रीप्ट लिहिली. ज्या विजय बारसेंवर झुंड हा चित्रपट आधारित आहे, त्यांनी अनेक मुलांचं आयुष्य बदलून टाकलं. विजय बारसे एका कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक होते. निवृत्तीनंतर त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *