महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – मुंबई – स्विडनमधील मूळ कंपनीची भारतीय शाखा असणाऱया वोल्वोने आपल्या कार्स 2025 पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रीकवर आधारीत बाजारात आणण्याचे निश्चित केले आहे. 2025 पर्यंत 50 टक्के इतक्या कार्स बॅटरीवर आधारीत इलेक्ट्रीक स्वरूपाच्या कंपनीकडे असतील असे वोल्वोने म्हटले आहे. कंपनीची पहिली एक्ससी 40 ही इलेक्ट्रीक गाडी यावर्षी सादर केली जाणार आहे. वर्षाच्या दुसऱया सहामाहीत वोल्वोची पहिली इलेक्ट्रीक कार भारतीय रस्त्यावर उतरवली जाईल. युरोपमध्ये या गाडीला चांगले यश मिळाले असल्याचे कंपनीने सांगितले आहे.