महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – पुणे -फ्लिपकार्टवर (Flipkart) Mobile Bonanza Sale सुरू आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर मोठी सूट आहे. या सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी F41 फोन स्वस्तात खरेदी करता येणार आहे. या फोनची सुरुवातीची रक्कम 16,999 रुपये आहे. परंतु या सेलमध्ये फोन 15,499 रुपयांत खरेदी करता येणार आहे. एवढंच नाही तर Flipkart Smart Upgrade चा वापर केल्यास हा फोन 10,849 रुपयात मिळणार आहे.
Samsung Galaxy F41 ची खास बाब म्हणजे या फोनला इनफिनिटी-U सुपर AMOLED डिस्प्ले, 64 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 6000mAh बॅटरी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फोनच्या बेस मॉडेल 6GB64GB ची किंमत 16,999 रुपये आहे. तर 6GB128GB वेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे.