उद्यापासून होणाऱ्या नव्या बदलांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – पुणे -काही नवीन बदल दरवर्षी मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून होत असतात. सर्व सामान्यांच्या रोजच्या जगण्यातील महत्वाच्या गोष्टींशी या बदलांचा थेट संबंध असतो. काही बदल यावर्षीही उद्यापासून होणार आहेत. कोरोना लस मिळण्याचा पुढील टप्पा सुरु होणार असून शिवाय एलपीजीच्या नव्या किंमती लागू होतील. काही राज्यांमध्ये प्राथमिक शाळा देखील सुरू होत आहेत. असेच काही नवीन बदल उद्यापासून होणार आहेत त्याची माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत.

आजारी, वयस्कर लोकांना मिळणार कोरोनाची लस – १ मार्चपासून आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा लागू होणार आहे. ६० वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठांना आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना उद्यापासून कोरोना लस मिळणार आहे. कोरोना लसीकरणाचा १ मार्चपासून पुढचा टप्पा सुरू होत आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये लस मोफत मिळणार असून खाजगीमध्ये काही शुल्क आकारले जाणार आहे.

एसबीआयमध्ये केवायसी अनिवार्य – एसबीआय ग्राहकांना उद्यापासून केवायसी अपडेट करणे अनिवार्य आहे. जे ग्राहक केवायसी अपडेट करून देणार नाहीत. त्यांना विविध सरकारी योजनांचा किंवा इतर योजनांचा लाभ घेताना समस्येला सामोरे जाऊ लागू शकते.

घरगुती गॅस सिलेंडरचे दर – दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती निश्चित करतात. या किंमतीत १ मार्च रोजी बदल होऊ शकतो. फेब्रुवारी महिन्यात एकूण ३ वेळा तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किंमती बदलल्या आहेत.

३ राज्यात प्राथमिक शाळा उघडणार – १ मार्चपासून उत्तर प्रदेश आणि बिहारमधील सर्व प्राथमिक शाळा (पहिली ते पाचवी) उघडणार आहेत. तर हरियाणामध्ये ग्रेड १ आणि २ साठी नियमित वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हरियाणामध्ये तिसरी ते पाचवीसाठी शाळा आधीच उघडल्या आहेत.

बँकांचे विलीनीकरण – 1 मार्चपासून विजया बँक आणि देना बँकेचा आयएफएससी कोड निष्क्रिय होईल. उद्यापासून या बँकांच्या ग्राहकांना नवीन IFSC कोड वापरावा लागणार आहे. या दोन्ही बँका बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झाल्यामुळे ग्राहकांना या बदलाला सामोरे जावे लागणार आहे. याबाबतची पूर्वसूचना बँकेने ग्राहकांना दिली आहे. हे विलीनीकरण 1 एप्रिल 2019 पासून लागू झाले आहे. आता या दोन्ही बँकांचे ग्राहक बँक ऑफ बडोदाचे ग्राहक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *