लसीकरणासाठी को-विन पोर्टलवर नोंदणीची सुविधा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २ – नवीदिल्ली – देशव्यापी लसीकरणाच्या कार्यक्रमाने आता वेग घेतला असला तरी अद्याप लसीकरणासाठी नोंदणी कुठे करायची, यासंबंधी संभ्रम आहे. को-विन या ऍपवर ही नोंदणी करण्यासाठी अनेकांचा प्रयत्न आहे. पण त्यात अडचणी येत आहेत. तथापि, को-विन हे ऍप सर्वसामान्य नागरिकांसाठी नाही, हे महत्वाचे स्पष्टीकरण सरकारने सोमवारी केले. हे ऍप केवळ प्रशासकांसाठी, अर्थात, सरकारी कर्मचारी आणि आघाडीवरचे कोरोना योद्धे यांच्यासाठी आहे. सर्वसामान्यांनी को-विन या वेबसाईटवर जाऊन नोंदणीसंबंधी माहिती पहावी, असे स्पष्ट करण्यात आले.को-विन पोर्टलच्या माध्यमातून वेबसाईटवर सर्वसामान्यांनी लसीकरणासाठी नोंदणी करावी. नागरिक लसीकरणासाठी केव्हाही आणि कोठेही नोंदणी करून अपॉइंटमेंट घेऊ शकतात. यासाठी को-विन पोर्टल प्रमाणेच आरोग्य सेतू व इतर काही वेबसाईटस्वरही नोंदणी होऊ शकते.

लस घेण्याची इच्छा असणारे नागरीक प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊनही नोंदणी करू शकतात. कोणत्याही लसीकरण केंद्रावर ही नोंदणी केली जाऊ शकते. त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याची माहितीही वेबसाईटवर देण्यात आली आहे. या बेबसाईटस्चा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरीक आणि व्याधीग्रस्त यांच्या लसीकरणाला 1 मार्च, अर्थात, सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. या उपक्रमाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कारण, सोमवारी पहिल्या दिवशीच दुपारी 1 वाजेपर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांनी लसीसाठी नोंदणी को-विन या वेबसाईटवर केली आहे. लसींचा तुटवडा पडणार नाही, याची दक्षता सर्व केंद्रांवर घेतली जाणार आहे.

कोणते नागरिक पात्र ?…

# 60 वर्षांवरील किंवा 1 जानेवारी 2022 पर्यंत ज्यांना 60 वर्षे पूर्ण होत आहेत असे सर्व नागरीक नोंदणी करण्यासाठी पात्र

# 45 वर्षांवरील किंवा ज्यांना 1 जानेवारी 2022 पर्यंत 45 वर्षे पूर्ण होत आहेत असे व्याधीग्रस्त नागरीकही नोंदणीसाठी योग्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *