लवकरच सुरू होणार IPL चा थरार ? अंतिम निर्णय झालेला नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.६ मार्च – अहमदाबाद – :IPL 2021 भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार विजय मिळवल्याने आनंदात असलेल्या चाहत्यांना आणखी एक चांगली बातमी मिळणार आहे. या वर्षी होणाऱ्या आयपीएलचा १४वा हंगाम ९ एप्रिल ते ३० मे या काळात होण्याची शक्यता आहे.आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलच्या बैठकीत या तारखांना परवानगी दिली तर स्पर्धा या काळात होऊ शकते. अर्थात सामने कोणत्या मैदानावर आणि त्याच्या तारखा याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. या बाबत अंतिम निर्णय पुढील आठवड्यात होऊ शकतो.

बीसीसीआयमधील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही अंतिम निर्णय घेतला आहे. आयपीएल नऊ एप्रिल ते ३० मे या काळात होईल. पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत त्याला औपचारिक मंजुरी मिळेल. करोना व्हायरसमुळे बीसीसीआयने चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद या शहरात सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

यातील मुंबई होणाऱ्या सामन्यांसाठी परवानगी घ्यावी लागले. कारण गेल्या काही दिवसात मुंबई आणि महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तर कोलकातामधील सामने देखील विधानसभा निवडणुकीचा विचार करून निश्चित केले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *