Atum १.० ; फक्त ७ रुपयात १०० किलोमीटर धावणारी बाईक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.६ मार्च – मुंबई – आजकाल ब-याच वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करत आहेत. यात काही स्टार्टअप्सही समोर आले आहेत, जे स्वस्त दरात इलेक्ट्रिक दुचाकी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. हैदराबाद येथील व्हीकल स्टार्ट अप Atumobile प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आपली न्यू जनरेशन इलेक्ट्रिक बाईक Atum (एटम) १.० चे वितरण सुरू केले आहे. ही रेसर रेसर स्टाईल इलेक्ट्रिक बाईक खास भारतीय ग्राहकांची गरज ओळखून तयार केली गेली आहे. या नव्या Atum १.० ची बेस किंमत ५० हजार रुपये आहे. ही बाईक रेट्रो, व्हिंटेज डिझाइन मध्ये उपलब्ध असेल. Atum १.० ही कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलवर भारतात उपलब्ध आहे.

Atum १.० ई बाइक मध्ये पोर्टेबल लिथियम आयन बॅटरी असून केवळ ४ तासात चार्ज होते. कंपनीकडून बॅटरीला दोन वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. बॅटरी एकदा फुल चार्चिंग केल्यावर तब्बल १०० किलोमीटर पर्यंतचे अंतर आरामात कापू शकते. Atum 1.0 या न्यू जनरेशन इलेक्ट्रिक बाईकमध्ये ६ किलोग्रॅमची पोर्टेबल बॅटरी देण्यात आली आहे. ३ पिन सॉकेट सोबत कुठेही चार्ज करता येऊ शकते. Atum 1.0 मध्ये १०० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी फक्त ७ ते ८ रुपये लागतात.

कंपनीने Autm १.० अनेक आकर्षक रंगामध्ये उपलब्ध करून दिली असून यात हाय परफॉर्मंस फिचर्स देखील आहेत. कंपनीच्या माहितीनुसार या ई-बाईकला भारतात निर्मिती केलेल्या पार्टस् च्या माध्यमातून बनवण्यात आले आहे. याचं डिझाईन खूपच आकर्षक आहे. कसल्याची रस्तावर धावण्यासाठी या ई- बाईकमध्ये हेवी टायर्स, कम्फर्टेबल सीट्स, डिजिटल डिस्प्ले तसेच एलइडी हेडलाईट, इंडीकेटर्स आणि टेल लाइट देण्यात आले आहेत. बाईकची वेगवेगळ्या विषम परिस्थितीत बाइकचे यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *