या शहरांत आता मेट्रो लाइट-मेट्रो नियो

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.७ मार्च – मुंबई – देशात सार्वजनिक वाहतुकीसाठी शहरांमध्ये आता मेट्राे आवडीची ठरत आहे. तरी केंद्र सरकार यातील खर्च पाहता नवीन प्रकल्पांना मंजुरी देणार नाही. याएेवजी १० ते २५ लाख लाेकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मेट्राे लाइट आणि मेट्राे नियाे चालवल्या जातील.

देशात सध्या २७ शहरांमध्ये मेट्राे रेल्वेचे काम वेगाने सुरू आहे. दिल्ली, जयपूरसह १८ शहरांमध्ये सुमारे ७१७ किलाेमीटर मार्गांवर मेट्राेचे काम सुरू आहे. तर, १००१ किलाेमीटर लांबीचा रेल्वेमार्ग आगामी पाच वर्षात पूर्ण हाेईल.

वास्तविक एक किलाेमीटर आेव्हरहेड मेट्राेवर जवळपास ३५० काेटी, भूमिगत मेट्राेवर ६०० ते ८०० काेटी आणि सपाट जमिनीवर प्रति किलाेमीटर २०० काेटी रुपये खर्च येताे. अशामध्ये माेठ्या शहरात मेट्राे चालू शकते. पण लहान शहरात खर्चाचे माेठे आव्हान आहे. त्या तुलनेत मेट्राे लाइटसाठी ४०% आणि मेट्राे नियाेसाठी २०% खर्च येताे. मेट्राेतून तासाला ५० हजार प्रवासी प्रवास करू शकतात. तर मेट्राे लाइट आणि मेट्राे नियाेची प्रवासी वाहतूक क्षमता १५ हजार आहे. लहान शहरांमध्ये इतकीच वाहतूक असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *