‘या’ वनस्पती अनेक गंभीर आजारांपासून दूर राहण्यास करतात मदत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.८ मार्च – पुणे – सध्याच्या काळात जागेच्या कमतरतेमुळे, लहान घरं असल्याने घरी लावलेल्या रोपट्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही आणि त्यामुळे ते लावणं अवघड होतं. मात्र अशा काही वनस्पती आहेत, ज्यांच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश अगदी कमी प्रमाणात लागतो. त्या वनस्पतींना तुम्ही अगदी सहजपणे आपल्या घरात किंवा खोलीत वाढवू शकता. या रोपांमुळे खोलीत एक सकारात्मक उर्जा निर्माण होते, त्यामुळे तुमचा तणावदेखील मोठ्या प्रमाणात कमी होतो. तसंच तुम्ही राहत असणाऱ्या ठिकाणी प्रदूषणाचं प्रमाण जास्त असेल, तर या वनस्पती हवेतील रसायनं शोषून घेऊन हवा शुद्ध करतात.

बांबू प्लांट –

जर तुम्ही एखाद्या अपार्टमेंटसारख्या ठिकाणी रहात असाल ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश खूप कमी प्रमाणात येतो. अशा ठिकाणी तुम्ही बांबू प्लांट लावू शकता. हवेत ट्राईक्लोरेथिलीन आणि बेन्जिन मोठ्या प्रमाणात असतं. त्यांना फिल्टर करून हवेला शुद्ध करण्याचं काम बांबू पाम करतं. ही हानिकारक तत्वं फर्निचरद्वारे हवेत पसरत असतात. त्यांना वेळीच स्वच्छ करणं गरजेचं असतं. त्यामुळे बांबू पाम तुम्ही खोलीतील फर्निचर जवळ सुद्धा ठेऊ शकता.

स्नेक प्लांट –
जर तुम्ही सतत बाहेर जात असाल, तर हे रोपटं आवर्जून लावा. कारण या रोपट्याला जास्त काळजी घेण्याची गरज नसते. अनेक दिवस हे रोप विनापाण्याचं राहू शकतं. स्नेक प्लांट खोलीतील हवा शुध्द करण्यास मदत करतं.

ग्रीन स्पायडर प्लांट –
ग्रीन स्पायडर या रोपाला देखील पाणी खूप कमी प्रमाणात लागतं. ही वनस्पती रुममधीव हवा शुद्ध करते. या रोपाची पानं कोष्टीच्या जाळ्याप्रमाणे असतात. त्यामुळे त्याला ग्रीन स्पायडर म्हंटलं जातं.

वीपिंग फिग –
धुळीची अलर्जी असेल, तर हे रोपटं खोलीत नक्की लावा. कारण ही वनस्पती हवेतील धुळीचे कण शोषून घेते. या रोपाला सुंदर पांढऱ्या रंगाची फुलं असतात.

वॉर्नक ड्रेकेना –
जर तुम्ही जास्त प्रदूषण असणाऱ्या भागात राहत असाल, तर हे रोप आपल्या खोलीत लावा. कारण हे रोपं हवेतील प्रदूषण कमी करून हवा स्वच्छ, शुद्ध करण्यास मदत करतं. या रोपाला सूर्यप्रकाशाची गरज नसते, त्यामुळे घरी लावण्यासाठी हे एक उत्तम रोपं समजलं जातं.

ऑर्किड प्लांट –
ऑर्किड प्लांटला अतिशय सुंदर फुलं असतात. त्यामुळे खोलीतील सौंदर्य, तर वाढतंच शिवाय हवा शुद्ध होते. हवेत जाईलीन आणि टोल्यून नावाची दोन हानिकारक गोष्टी आढळतात. ऑर्किड हवेतून या रसायनांना शोषून घेतं आणि हवा शुद्धीकरण करतं.

पीस लिली –
हे रोपटं हवेतून ट्राईक्लेरोथीन आणि बेन्जिनला शोषून घेतं आणि हवा शुद्ध करतं. ज्यांना दमा आहे किंवा श्वास घेण्यास त्रास होतो अशा लोकांनी तर हे रोप आवर्जून आपल्या खोलीत लावलं पाहिजे. कमी सूर्यप्रकाशामध्ये देखील हे रोपं जिवंत राहत. केमिकलसदृश्य रूम फ्रेशनरचा वापर करण्याऐवजी या वनस्पतीचा वापर तुम्ही आपल्या खोलीत करू शकता. त्यामुळे चांगला सुगंधही खोलीत राहू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *