महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.८ मार्च – जुन्या कार स्क्रॅप पॉलिसी संदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी एक महत्वाची घोषणा केली आहे. वाहनधारकांनी जुनी कार स्क्रॅप केल्यास नव्या कारवर 5 टक्के सूट मिळणार आहे.
2021-22 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने खासगी वाहनांना 20 वर्षानंतर तर कमर्शियल वाहनांना 15 वर्षानंतर स्क्रॅप करण्याचे धोरण आणले. या स्क्रॅप धोरणाचे 4 मुख्य घटक आहेत. प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर ग्रीन टॅक्स आणि इतर शुल्क आकारण्याची तरतूद यामध्ये आहे. यामध्ये फिटनेस आणि प्रदूषण चाचणी करून घ्यावी लागणार आहे. सेल्फ ड्राईव्ह चाचणीत अनुत्तीर्ण होणाऱ्या वाहनांकडूनही दंड आकारला जाणार आहे.
सरकार खासगी भागिदारांना आणि राज्य सरकारांना स्क्रॅपसाठी आवश्यक यंत्रसामग्री उभारण्यास मदत करेल, असेही गडकरी म्हणाले.