महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.८ मार्च – अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरुवात केली. यावेळी महाराष्ट्र कुठल्याही संकटाला झुकलेला नाही असेही अजित पवार म्हणाले. सोबतच, कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या कोरोना योद्धा आणि सामान्य नागरिकांना श्रद्धांजली वाहिली.
आरोग्य सेवेसाठी
कोरोनाच्या संकटात आरोग्य सेवेसाठी 7500 कोटी रुपयांची तरतूद
रुग्णालयांत आग प्रतिबंधक यंत्रणा लावण्यात येईल
वैद्यकीय शिक्षण विभागासाठी 1517 कोटी
आरोग्य विभागाला 2900 कोटी रुपये मंजूर
उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, अमरावती, परभणीत मेडिकल कॉलेज उभारणार
रुग्णालयांत आग प्रतिबंधक यंत्रणा लावण्यात येईल
11 परिचारिक प्रशिक्षण वर्गांचे महाविद्यालयात रुपांतर
मनपा क्षेत्रांसाठी 5 वर्षांत 5 हजार कोटी
लातूर जिल्हा बाह्यरुग्ण इमारतीसाठी 73 कोटी
ससून कर्मचारी निवास करिता 28 कोटी
आटपाडीच्या ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय बनवणार
मोशीमध्ये आरोग्य प्रशिक्षण केंद्र उभारणार
शेतकऱ्यांसाठी
शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने
शेतकऱ्यांना 19 हजार कोटी थेट वर्ग केले
कृषी पंप जोडणी धोरणासाठी 1500 कोटी रुपये देणार
42 हजार कोटींचे पीक कर्ज देण्याचे उद्दिष्ट
विकेल ते पिकेल योजनेसाठी 2100 कोटी रुपये
4 कृषी विद्यापीठांना कृषी संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी, 3 वर्षांत 600 कोटी देण्याचे निश्चित
4 वर्षात बाजार समित्यांसाठी 2 हजार कोटींची तरतूद
सहकार आणि पणन
जलसंपदा विभागासाठी 12951 कोटी रुपयांची तरतूद
जलसंपदा विभागाच्या 278 कोटींच्या प्रकल्पांचे काम सध्या सुरू
सहकार आणि पणन विभागासाठी 1284 कोटी
प्रधानमंत्री सिंचन योजनेच्या अंतर्गत 26 प्रकल्पांना 21698 कोटी
गोसेखुर्दसाठी 1 हजार कोटी मंजूर, डिसेंबर 23 अखेर पूर्ण करणार
12 धरणांच्या बळकटीसाठी 624 कोटी रुपये मंजूर
रस्ते, पायाभूत विकासासाठी
रेल्वे मार्ग विकासासाठी 16139 कोटी रुपयांची तरतूद
राज्यातील रस्ते विकासासाठी 12950 कोटी रुपयांची तरतूद
पुणे, नगर नाशिक रेल्वे विकासावर केला जाणार खर्च
पुण्याजवळ नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार
ठाण्यात वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पासाठी 7500 कोटी रुपये
समृद्धी महामार्गाचा 500 किमीचा रस्ता 1 मे पासून खुला
नांदेड जालना 200 किमीचा नवा मार्ग उभारणार
पूर्वमुक्त मार्गाला विलासराव देशमुख यांचे नाव
समृद्धी महामार्गाचे 44% काम पूर्ण झाले
आपत्ती व्यवस्थापनासाठी 11315 कोटी
5689 कोटी रुपयांच्या रस्ते विकासाची कामे करणार