सावधान ;,महिला दिनाला फसणुकीसाठी फेक लिंक व्हायरल ; आकर्षक ऑफर देत होती फसवणूक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.८ मार्च – International women’s day 2021 वर अनेक कंपन्या महिलांसाठी आकर्षक ऑफर देत आहेत (Fake Link Viral On WhatsApp). पण, या ऑफर्सच्या चक्करमध्ये तुमची फसवणूकही होऊ शकते. WhatsApp वर मेसेजच्या माध्यमातून ऑफरचा लोभ देऊन महिलांच्या फसवणुकीचे अनेक प्रयत्न होत आहेत. WhatsApp वर एक मेसेज सर्क्युलेट होत आहे. यामध्ये दावा करण्यात आला आहे की, महिला दिनाला मोफत शूज दिले जातील आणि तेही एका मोठ्या ब्रांडचे (Fake Link Viral On WhatsApp Saying Adidas Offer Of Giving Free Shoes On International Women’s Day).

जर तुम्हालाही अशा प्रकारचा कुठला मेसेज आला असेल तर याला लगेच डिलीट करा. कारण, हा एक फेक मेसेज आहे. याच्या माध्यमातून तुमच्या खात्यातील पैसे लुटले जाऊ शकतात. तसेच, तुमची खाजगी माहितीही याद्वारे हॅक केली जाऊ शकते. WhatsApp वर दररोज हजारो मेसेज फॉरवर्ड केले जातात आणि काही लोक यावर विश्वासही ठेवतात. कुठल्या अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने अनेकदा युझरची फसवणूक होते. जागतिक महिला दिवसाला WhatsApp वर जो मेसेज पाठवला जात आहे त्यामध्ये दावा केला जात आहे की जोड्यांची मोठी कंपनी महिला दिवसावर महिलांना मोफतमध्ये शूज देत आहे. त्यामध्ये एक लिंकही आहे. याप्रकराची ती लिंक आहे – https://v-app.buzz/adidass/tb.php?_t=161492973315:35:33”. जर तुमच्याकडेही ही लिंक आली असेल तर लगेच ही लिंक डिलीट करा. या लिंकच्या माध्यमातून तुमची पर्सनल डिटेल चोरली जाऊ शकतात.

एडिडासच्या वेबसाईटवर अशा प्रकारची कुठलीही ऑफर नाही. जर कंपनी असा कुठला ऑफर युझर्सला देते तर ती आपल्या अधिकृत वेबसाईटवरही अपडेट करेल. अनेक कंपन्या आपल्या आधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरही याबाबत माहिती देतात. सोबतच लोकांना पाठवण्यात येणारी लिंकही संशयास्पद आहे. यूआरएलला अशा प्रकारे आहे – v-app.buzz/adidass.

यामध्ये एडिडासची स्पेलिंग चुकीची आहे. याचं स्पेलिंग Adidas आहे. कंपनीच्या वेबसाईटचं यूआरएल https://shop.adidas.co.in/ आहे. सोबतच या मेसेजमध्ये जो लोगो देण्यात आला आहे तो Adidas चा नाहीये. त्यामुळे तुम्ही या लिंकवर विश्वास नाही ठेवू शकत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *