महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.९ मार्च । पिंपरी चिंचवड ।राज्याला आपली अर्थव्यवस्था सुदृढ ठेवण्यासाठी आपल्या हक्काचा व खात्रीशीर असा उत्पन्नात चा स्तोत्र असला पाहीजे….जेणेकरून आपल्या राज्याच्या परिस्थितीनुसार आर्थिक नियोजन करता येईल व अकस्मात येणाऱ्या आर्थिक संकटातून मार्ग काढता येईल. प्रत्येक वेळेस केंद्र सरकार वर अवलंबून राहणे आर्थिक नियोजनाच्या दृष्टीकोनातून योग्य नाही……म्हणुन अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी मद्यावर 5 % राज्यकर आकारून आर्थिक स्तोत्र निर्माण केला आहे जेणेकरून राज्याला डायरेक्ट उत्पन्नाचा मार्ग तयार झाला. ….ज्या प्रमाणे पुर्वी विक्रीकर कायद्यात तरतूद होती की राज्याचा विक्रीकर (State Sales Tax) व केंद्रीय विक्रीकर (Central Sales Tax) हे सेप्रेट होते. त्याचे संकलनही सेप्रेट होते..
केंद्राचे पैसे केंद्राच्या खात्यात जमा व्हायचे व राज्याचे पैसे राज्याच्या खात्यात जमा व्हायचे….त्या मुळे दोघांना ही एकमेकांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नव्हती…..त्या प्रमाणेच व्हॅट कायद्यातही तरतूद होती. त्यामुळे राज्या च्या आर्थिक नियोजना साठी केंद्रावर अवलंबून राहावे लागत नव्हते…मात्र वस्तूं व सेवा कर GST कायदा लागू झाल्यानंतर राज्याचे विक्रीकराचे हिस्साचे पैसे केंद्रा कडे जमा व्हायला लागलेत व नंतर तेच पैसे केंद्राने त्यांच्या पद्धतीने…त्यांच्या सोयीनुसार देने ही पद्धत व्यवहारिक तर नाहीच उलट पक्षी केंद्रात व राज्यात वाद निर्माण होण्याचे कारण झाले आहे…..केंद्रीय अर्थसंकल्पात हा प्रश्न सुटावा अशी अपेक्षा होती पण ती निरर्थक ठरली…..राज्याच्या अर्थसंकल्पाच्या तरतूदी नियोजन बद्ध करण्यासाठी ही एक अडचण होती म्हणून….राज्याचे अर्थमंत्री मा. अजीत दादा पवार यातून कसा मार्ग काढणार या कडे अर्थतंज्ञांचे लक्ष लागून होते. …मात्र अनुभवी अर्थमंत्र्यांनी यातून पद्धतशीर पणे मार्ग काढला आहे जेणेकरून दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर कोणताही परिणाम होणार नाही.