महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.९ मार्च । मुंबई । “महाविकास आघाडी सरकारने मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे “घोषणांचा सुकाळ, तरतुदींचा दुष्काळ” आणि शब्दांचे बुडबुडे तसेच “बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी” असं मी म्हणेन! कारण कोकण, विदर्भ व मराठवाड्यावर अन्याय करणारा हा अर्थसंकल्प आहे.” अशा शब्दांमध्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे.
महाविकासआघाडी सरकारचा दुसरा (२०२१-२२) अर्थसंकल्प आज(सोमवार) उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. यावर प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडी सरकारने मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे "घोषणांचा सुकाळ, तरतुदींचा दुष्काळ" आणि शब्दांचे बुडबुडे तसेच "बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी" असं मी म्हणेन! कारण कोकण, विदर्भ व मराठवाड्यावर अन्याय करणारा हा अर्थसंकल्प आहे. #BudgetSession @BJP4Maharashtra
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) March 8, 2021