पुणे विद्यापीठाच्या परीक्षेबाबत आज निर्णय, विद्यार्थ्यांचं लक्ष निर्णयाकडे

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.९ मार्च । पुणे । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) प्रथम सत्राच्या परिक्षेबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची आज बैठक पार पडणार आहे. आजच्या बैठकीत प्रथम सत्राच्या परिक्षेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. (decision regarding Pune University exams, all students attention is on the decision)कोव्हिडच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या महाविद्यालये बंद असून ऑनलाईन क्लासेस सुरु आहे. अशा परिस्थितीत परीक्षा नेमक्या कशा घ्यायचा हा मोठा प्रश्न विद्यापीठ प्रशासनासमोर आहे. अशातच आज पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक पार पडतीय. या बैठकीत परीक्षेसंजर्भात काहीतरी ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाच्या नियोजित वेळापत्रकानुसार येत्या सोमवारपासून प्रथम सत्राची परीक्षा होणार आहे. मात्र या परीक्षेसाठी नेमावयाच्या एजन्सीचा अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे आठवभरात सुरू होणारी ही परीक्षा लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट आहे.परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून एजन्सीमार्फत परीक्षा घ्यावी लागणार आहे. अशा स्थितीत सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष आजच्या परीक्षा मंडळाच्या निर्णयाकडे लागलं आहे. परीक्षा होणार की नाही? झाली तर ती कधी आणि कुठे होईल? असे संभ्रमाचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहेत.

पुणे विद्यापीठाशी संलग्न तीनही जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील सुमारे साडे सहा लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा 15 मार्च ते 30 मार्चपासून सुरु करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र परीक्षेचे काम जुन्याच एका एजन्सीला देणे नियमाला धरुन नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येत्या 15 मार्चपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरु करणं शक्य नसल्याचं स्पष्ट आहे.परंतु विद्यापीठाने अद्यापपर्यंत याविषयी कोणताही निर्णय घेतला नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम कायम आहे. विद्यापीठाने परीक्षेबाबतचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *