पेट्रोल-डिझेल ‘जीएसटी’ कक्षेत आणल्यास राज्याचा पाठिंबा ; अर्थमंत्री अजित पवार

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.११ मार्च । मुंबई । राज्याच्या २०२१-२२ च्या अर्थसंकल्पाला विधिमंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली. राज्यातील विधानसभा व विधान परिषद सदस्यांना विकासकामांसाठी मिळणारा आमदार निधी एक कोटी रुपयांनी वाढवून ४ कोटी रुपये करण्याची आणि विविध जाती-समाजांसाठी असलेल्या विकास महामंडळांना प्रत्येकी १०० कोटी रुपये निधी देण्यासह ई-निविदेची मर्यादा ३ लाखांवरून १० लाख रुपये करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना के ली.

तसेच पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्यासाठी ते वस्तू व सेवा कराच्या कक्षेत आणण्याची गरज असून के ंद्र सरकारने तसा प्रस्ताव आणल्यास महाराष्ट्र पाठिंबा देईल, असेही त्यांनी जाहीर के ले. विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याच्या अर्थसंकल्पावर दोन्ही सभागृहांत चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *