महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.११ मार्च । रत्नागिरी । राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिमग्याच्या उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसमोर विघ्न उभे राहण्याची शक्यता आहे. कारण, होळीसाठी कोकणात (Konkan Holi) येणाऱ्या चाकरमन्यांची कोरोना चाचणी (Coronavirus) केली जाणार आहे. ही चाचणी नेगेटिव्ह आली तरच चाकरमन्यांना आपल्या गावात प्रवेश मिळेल. (Coronavirus test will be mandatory for peoples going in Konkan village for Holi festival)
त्यासाठी प्रशासनाकडून जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत यासंदर्भातील आदेश काढले जातील. त्यानंतर कोकणात जाणाऱ्या नागरिकांची कोरोना टेस्ट करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होईल, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.