मार्च ते जूनपर्यंतच्या कालावधीत भरतीत होणार वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.११ मार्च । पुणे । कोरोना काळात अनेकांच्या मोठय़ा प्रमाणात नोकऱया गेल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेकांच्या वेतनामध्ये कपातही करण्यात आली आहे. दरम्यान मार्च ते जून या येणाऱया काळामध्ये नोकरभरतीमध्ये वाढ होण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. या संदर्भातले एक सर्वेक्षण मॅनपॉवर ग्रुप यांनी नुकतेच केले होते. मार्च ते जून या कालावधीमध्ये भरतीत वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. याबाबत मॅनपॉवर ग्रुपने 2 हजार 375 कंपन्यांशी बातचीत केली असता त्यांच्याकडून येणाऱया काळात नोकर भरती होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *