महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१२ मार्च ।पुणे । पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाउनलावायचे का? या बाबतचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज (शुक्रवार) होणार्या बैठकीत केला जाईल.
पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढत आहे. हा आकडा अडीच हजारांच्यावरती गेला असल्याचे समोर आले आहे. रुग्णांचा आकडा वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. हा आकडा असाच वाढत राहिला तर कडक प्रतिबंध करायचे की लॉकडाऊन पुन्हा एकदा करायचा याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. पुणे जिल्ह्याचे विभागीय आयुक्त सौरव राव आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी प्रशासकीय यंत्रणा सज्ज केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे देखील सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचे आवाहन वारंवार करीत आहेत. लोकांना त्यांनी नियम पाळण्याचे आवाहन केलेले आहे. हे नियम पाळले नाही तर त्या त्या जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. पुण्यातील मास्कच्या कारवाईतून आतापर्यंत 26 कोठी रुपये वसूल करण्यात आलेले आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. लोक नियमांचे पालन करीत नसल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे समोर येत आहे.