महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१३ मार्च । अहमदाबाद । भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आता उद्या (रविवारी) होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवायचा असेल, तर त्यासाठी त्यांना संघात काही महत्वाचे बदल करावे लागतील. भारताच्या गोलंदाजीमध्ये नेमके कोणते बदल होतील, याकडे सर्वांच्या नजरा नक्कीच असतील. कारण पहिल्या सामन्यात फलंदाजांबरोबर गोलंदाजांनाही फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. युजवेंद्र चहलने विकेट मिळवली असली तरी त्याच्या गोलंदाजीवर सर्वाधिक धावा गेल्या होत्या. त्यामुळे कदाचित या सामन्यात चहलला संघाबाहेर राहावे लागू शकते. पण त्याच्या जागी संघात कोणत्या गोलंदाजाला खेळवायचे, याचा विचार संघ व्यवस्थापनाला करावा लागेल.
रोहित शर्माला दुसऱ्या सामन्यात खेळवायला हवे, अशी मागणी चाहत्यांकडून होत असल्याचेही पाहायला मिळत आहे. पण संघात जर रोहितला संधी द्यायची असेल, तर त्यासाठी काही महत्वाचे बदल करावे लागतील.रोहितला जर दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळवायचे असेल तर लोकेश राहुल किंवा शिखर धवन या दोघांपैकी एकाला डच्चू द्यावा लागेल. राहुल हा यष्टीरक्षणही करू शकतो, त्यामुळे त्याची बाजू ही धवनपेक्षा वरचढ असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे जर रोहितला संघात स्थान द्यायचे असेल तर त्यासाठी धवनला वगळणे संघ व्यवस्थापनाला थोडेसे सोपे जाऊ शकते.
सूर्यकुमार यादवला कधी संधी मिळणार, असा प्रश्नही चाहत्यांकडून विचारला जात आहे. पण सध्याच्या घडीला मधल्या फळीतील कोणताही फलंदाज सातत्याने अपयशी ठरलेला नाही. विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी आपले संघातील स्थान भक्कम केलेले आहे. त्यामळे दुसऱ्या सामन्यात तरी सूर्यकुमारला संधी मिळू शकत नाही, असे दिसत आहे. पण कर्णधार कोहली हा अंतिम ११ जणांच्या संघात नेहमीच बदल करत असतो. त्यामुळे मधल्या फळीत भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात नेमका कोणता बदल करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.भारताच्या गोलंदाजीमध्ये नेमके कोणते बदल होतील, याकडे सर्वांच्या नजरा नक्कीच असतील. कारण पहिल्या सामन्यात फलंदाजांबरोबर गोलंदाजांनाही फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. युजवेंद्र चहलने विकेट मिळवली असली तरी त्याच्या गोलंदाजीवर सर्वाधिक धावा गेल्या होत्या. त्यामुळे कदाचित या सामन्यात चहलला संघाबाहेर राहावे लागू शकते. पण त्याच्या जागी संघात कोणत्या गोलंदाजाला खेळवायचे, याचा विचार संघ व्यवस्थापनाला करावा लागेल.