Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ’मधील ‘सुंदरलाल’ला झाला करोना - Maharashtra 24

‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ’मधील ‘सुंदरलाल’ला झाला करोना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १४ मार्च – मुंबई – छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील दयाबेनचा भाऊ सुंदरलालची भूमिका साकारणारा अभिनेता मयूर वकानीला करोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.

काही दिवसांपूर्वी मयूर मालिकेच्या चित्रीकरणासाठी अहमदाबादहून मुंबईला आला होता. चित्रीकरण पूर्ण करताच तो पुन्हा अहमदाबादला रवाना झाला. तेथे पोहोचल्यावर त्याला ताप आला होता. त्याने तातडीने करोना चाचणी करुन घेतली आणि ती पॉझिटीव्ह आली. त्यानंतर मयूरला अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची परिस्थिती स्थिर आहे.

https://www.instagram.com/hemali_vakani/?utm_source=ig_embed

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत मयूर सुंदरलाल म्हणजेच दया बेनच्या भावाची भूमिका साकारत आहे. मालिकेतील मयूर आणि दिशाची भाऊ-बहिणीची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. मयूर आणि मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणी दिशा वकानी हे खऱ्या आयुष्यातही बहिण-भाऊ आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून दिशाने मालिकांमधून ब्रेक घेतला आहे. तिला पुन्हा मालिकेत पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *