महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १४ मार्च – नाशिक – नाशिकमधील वाढत्या कोरोनाचा संसर्ग बघता शहरातील सर्व दुकानं शनिवार-रविवार बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाणे घेतला. मात्र, यात सलून चालक नाराज झाले आहेत. आमचा व्यवसाय हा शनिवार रविवारचा जास्त प्रमाणात चालत असताना जर याच दिवसात दुकानं बंद ठेवली तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे प्रशासनाणे आम्हाला दुकान सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी सलून चालकांनी केली आहे. यासंदर्भात सलून चालकांशी बातचीत केली आहे.
परभणीत तात्पुरत्या स्वरूपात शाळा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे परभणीत तात्पुरत्या स्वरूपात शाळा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश