महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१५ मार्च ।पुणे ।गुगल आपला नेक्स्ट जनरेशन पिक्सल 5 ए स्मार्टफोन 11 जून रोजी सादर करणार असल्याचे समजते. टिपस्टर जॉन प्रोसेरसोबत गुगल पिक्सल 5ए सादर करण्याची योजना बनवत आहे. या उपकरणामध्ये पंच-होल डिस्प्लेसोबत स्क्रीन उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. लेटेस्ट स्मार्टफोन पिक्सल 4 ए मध्ये 5-जी फिचर्ससह येण्याची शक्यता आहे. तसेच याचे डायमेंशन मजबूत राहणार आहे. कोरोना महामारीच्या कारणास्तव गुगलने या स्मार्टफोनच्या लाँचिंगची तारीख पुढे ढकलली आहे.
फोनमधील फिचर्स
# डबल कॅमेरा मिळण्याचे संकेत
#यामध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी ऑन बोर्ड स्टोरेज
#फोनमध्ये 3.5 मिनी हेडफोन जॅक, रियर फिंगरप्रिंट रीडर आणि स्टोरिओ स्पीकर
# 3840 एमएएच क्षमतेची बॅटरी