महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१५ मार्च । मुंबई । कोरोनामुळे विदभार्तील काही भागांत निर्बंध घालण्यात आले आहेत. आता होळीनिमित्त कोकणात जाणा-यांवर निर्बंध घालण्यात आल्याने एसटी महामंडळासमोर नवे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.नियमित गाड्यांना कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे होळीसाठी सोडण्यात येणा-या सुमारे ६०० जादा गाड्यांना प्रतिसाद मिळेल का, या चिंतेत अधिकारी आहेत. राज्यातील काही भागात तर वाढत जाणारी रुग्णसंख्या व निबंर्धांमुळे गेल्या २० ते २५ दिवसांत एसटीचे जवळपास १०० कोटी रुपये प्रवासी उत्पन्न बुडले आहे.मुंबई महानगरासह राज्यातील अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अन्य काही भागांत रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. परिणामी, राज्य शासनाने विदभार्तील बहुतांश भागांत जमावबंदी, संचारबंदी आदी निर्बंध घातले आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबईसह अन्य भागांतून कोणीही कोकणातील गावात येऊ नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रातून येणा-यांना ७२ तासांपूर्व कोरोना अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) येणे, प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना थर्मल स्क्रीनिंग व संशयित आढळल्यास त्याला होळी उत्सवात सहभागी करून घेऊ नये, घरोघरी पालखी नेण्यास मज्जाव इत्यादी नियमावली तयार करण्यात आली आहे.
त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणेसह अन्य भागांतून कोकणात जाणारे संभ्रमात पडले आहेत. परिणामी मुंबई, ठाणे, पालघरसह अन्य विभागांतून सोडण्यात येणा?्या ६०० जादा व नियमित गाड्यांना प्रतिसाद मिळेल का? या गाड्यांचे आधीच ५० टक्के आरक्षण झाले आहे. संपूर्ण १०० टक्के आरक्षण होईल की नाही, अशी शंका व्यक्त होत आहे.
कोरोनापूर्व काळात एसटीतून दररोज ५८ लाख प्रवासी प्रवास करीत होते आणि दररोज २२ कोटी रुपये उत्पन्न मिळत होते. प्रवासी संख्या पुन्हा कमी होऊ लागली आहे.