महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१८ मार्च । पुणे । पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरांमुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण विशेष म्हणजे सलग 17 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल होत नसल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. (Petrol Diesel Price Today rates in mumbai pune delhi petrol price today on 18th march 2021)
महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे नांदेड शहरात पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये पेट्रोलचा दर हा 99.63 रुपये इतका आहे. त्यापाठोपाठ परभणीत 99.33 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय नांदेडमध्ये डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. नांदेड शहरात डिझेलचा दर 89.25 रुपये इतका आहे.
देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे भाव
नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 91.17 रुपये प्रतिलीटर
मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.57 रुपये प्रतिलीटर
कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 91.35 रुपये प्रतिलीटर
चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 93.11 रुपये प्रतिलीटर
देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव
नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.47 रुपये प्रतिलीटर
मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.60 रुपये प्रतिलीटर
कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.35 रुपये प्रतिलीटर
चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 86.45 रुपये प्रतिलीटर