पुणेकरांसाठी चांगली बातमी ! 28 मार्चपासून पाच मोठ्या शहरांसाठी नॉन स्टॉप विमानसेवा होणार सुरू

Spread the love

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१८ मार्च । पुणे ।पुणेकरांसाठी एक चांगली बातमी आहे. खासगी विमान कंपनी स्पाइसजेट (SpiceJet) २८ मार्चपासून पुण्यातून पाच मोठ्या शहरांसाठी नॉन स्टॉप विमानसेवा सुरू करत आहे.दरभंगा, दुर्गापूर, ग्वाल्हेर, जबलपूर आणि वाराणसी या पाच शहरांसाठी पुण्यातून विमानसेवेला लवकरच सुरूवात होणार आहे. मेट्रो आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय. कंपनीने एका निवेदनाद्वारे याबाबत माहिती दिली. कंपनी किमान 66 नवीन फ्लाईट्स सुरु करणार आहे. शिवाय काही विशिष्ट मार्गासाठी अधिकच्या फ्लाईट सुरु करण्यात येतील. २८ मार्चपासून ही सेवा सुरु होईल.

छोट्या शहरांमधून विमान प्रवासाच्या वाढत्या मागणीमुळे UDAN योजनेअंतर्गत स्पाइसजेट आता नाशिक, दरभंगा, दुर्गापूर आणि ग्वाल्हेरला मेट्रो शहरांसोबत जोडण्यासाठी नव्या फ्लाईट्स सुरु करणार आहे, असंही स्पाइसजेटने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. पुण्याला विमानाद्वारे दरभंगा, दुर्गापूर, ग्वाल्हेर, जबलपूर आणि वाराणसी या शहरांशी जोडणारी स्पाइसजेट ही पहिली कंपनी असल्याचंही कपंनीने म्हटलं आहे. दरम्यान, नाशिक शहरावरुन दिल्ली, हैदराबाद आणि बेंगळुरु या शहरांसाठी स्पाइसजेटने सेवा सुरू केली होती, आता कोलकाता शहरासाठीही विमानसेवा सुरु करण्यात येणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *