महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१८ मार्च । पुणे ।कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम, स्कूल फ्रॉम होम अशा संकल्पना राबवल्या जात असल्याने या इलेट्रॉनिक साधनांना मागणी वाढली आहेत. आजही अनेक जण वर्क फ्रॉम होम करत असल्याने कामाचा दबाव वाढला आहे. राज्य सरकारनेही ऑफिसेना आपल्या कर्मचाऱ्यांना शक्य तितकं वर्क फ्रॉम होम देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांचा कल लॅपटॉप आणि स्मार्टफोन खरेदीकडे अधिक असल्याचं चित्र आहे. ग्राहकांची गरज ओळखून अनेक कंपन्यांनी कमी किमतीचे लॅपटॉप बाजारात आणले आहेत. बाजारातील विविध वैशिष्ट्य असलेले लॅपटॉप्स पाहता, अनेकदा ग्राहक कोणता लॅपटॉप घ्यावा, याबाबात संभ्रमित असतात. मात्र, भारतात अगदी 30,000 रुपयांपेक्षा कमी किमतीचे तसंच चांगले फीचर्स असलेले लॅपटॉप उपलब्ध आहेत.
Avita Pura –
अविता प्युराच्या लॅपटॉपची किंमत अॅमेझॉनच्या वेबसाइटवर (Amazon) 28,499 रुपये असून, यात 3200 U कन्फीग्रेशनचा AMD Ryzen प्रोसेसर आहे. AMD Radeon vega 3 GPU, यात 8 जीबी डीडीआर, 4 रॅम आणि 256 जीबी एसएसडी आहे. 14 इंची एलईडी बॅललिट आयपीएस डिस्प्ले, फूल एचडी रिझोल्युशन (HD Resolution) यात देण्यात आला आहे. हा लॅपटॉप मायक्रोसॉफ्ट विंडोज 10 होम एस मोडवर रन होतो. यातील बॅटरी 10 तासांपर्यंत चालू शकते. हा 30,000 पेक्षा कमी किमतीच्या लॅपटॉप यादीतील अत्यंत बेस्ट लॅपटॉप (the best laptop)आहे.
Lenovo V 15 –
लेनोव्हो व्ही 15 (Lenovo V 15) हा लॅपटॉप अॅमेझॉनवर 28,480 रुपयांना उपलब्ध आहे. हा डिओएस ऑपरेटिंग सिस्टीमसह उपलब्ध आहे. या लॅपटॉपमध्ये AMD Ryzen 33250 U प्रोसेसर देण्यात आला आहे. या लॅपटॉपचा टीएन पॅनेल 15.6 इंचाचा आणि एचडी रिझोल्युशनचा (HD Resolution) आहे. यामध्ये 4 जीबी डीडीआर, 4 ऱॅम ( रॅम 16 जीबीपर्यंत वाढवता येतो) आणि 1 टीबी हार्ड डिस्क ड्राईव्ह (Hard Disk Drive) आहे. यामध्ये AMD ग्राफिक्स देण्यात आलं असून याची बॅटरी 5 तासांपर्यंत चालू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.
Dell Inspiron 3595 –
डेल इन्स्पिरॉन 3593 (Dell Inspiron 3595) हा या यादीतील सर्वात चांगल्यारितीने बिल्डअप केलेला लॅपटॉप असून तो फ्लिपकार्टवर (FlipCart) 27,900 रुपयांना उपलब्ध आहे. या लॅपटॉपचा डिस्प्ले 15.6 इंचाचा आणि एचडी रिझोल्युशन असलेला एलईडी ट्रुलाईफ डिस्प्ले (LED true life Display) आहे. यात AMD A9 ड्युएल कोअर 9425 APU प्रोसेसर आहे. तसंच AMD Radeon R5 APU इंटीग्रेटेड ग्राफिक्स देण्यात आलं आहे. यात 4 जीबी डीडीआर रॅम (एक्सपांडेबल 16 जीबी) आणि 1 टीबी हार्डडिस्क आहे. हा लॅपटॉप विंडोज 10 होम ऑपरेटेड सिस्टमवर रन होतो. तसंच यात ऑफिस होम आणि स्टुडंट 2019 देखील प्रिलोडेड आहे. हा लॅपटॉप व्हेव्ह मॅक्स ऑडिओला (Wavv Max Audio) सपोर्ट करतो.
HP 15 –
एचपी 15 (HP 15) हा लॅपटॉप अॅमेझॉनवर 29,490 रुपयांना उपलब्ध आहे. याचा डिस्प्ले 15.6 इंची आणि एचडी डब्ल्यूएलईडी ब्राईट व्हिव्हयू आहे. यात AMD Ryzen 33200 U प्रोसेसर असून, AMD Radeon Vega 3 जीपीयू आहे. या लॅपटॉपचा रॅम 4 जीबी डीडीआर4 असून तो 16 जीबी पर्यंत एक्सपांडेबल आहे, तर हार्डडिस्क ड्राईव्ह 1 टीबी आहे. विंडोज 10 होम ऑपरेटिंग सिस्टमवर हा रन होतो. याचा बॅटरी बॅकअप 41 WHr आहे.
Asus Vivobook 14 –
असूस व्हिव्होबुक 14 (Asus Vivobook 14) अॅमेझॉनवर सध्या 26,990 रुपयांना उपलब्ध आहे. याचा डिस्प्ले 14 इंच एलईडी अॅण्टीग्लेअरसह स्लिम बिझेल्स आणि एचडी रिझोल्युशन असलेला आहे. या लॅपटॉपमध्ये AMD Athlon Silver 3050 U प्रोसेसर असून AMD Radeon vega 2 जीपीयू आहे. यात 4 जीबी डीडीआर 4 रॅम असून, 1 टीबीचा हार्डडिस्क ड्राईव्ह आहे. युजर्स या लॅपटॉपमधील रॅम 12 जीबी पर्यंत वाढवू शकतात. तसंच यात स्टोरेज वाढवण्यासाठी M.2 SSD देण्यात आलं आहेत. या लॅपटॉपमध्ये मायक्रोसॉफ्ट विडोंज 10 ऑपरेटिंग सिस्टम (Microsoft Windows 10 OS) असून मायक्रोसॉफ्ट ऑफिस होम आणि स्टुडंट 2019 देखील देण्यात आले आहे. यात फिंगरप्रिंट रिडर (Fingerprint Reader) फीचर असून, बॅटरी लाईफ 6 तासांपर्यंत आहे.