Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
सोन्या-चांदीचे दर वधारले , जाणून घ्या आजचा भाव ! - Maharashtra 24

सोन्या-चांदीचे दर वधारले , जाणून घ्या आजचा भाव !

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१९ मार्च । नवीदिल्ली । सोन्याचांदीच्या किंमती (Gold and Silver Rate) कालच्या तुलनेत वाढलेल्या पाहायला मिळतायत. सोन्यातली गुंतवणूक ही भविष्य काळासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे महागाई असली तरी सोन्या चांदीच्या दर पाहून शक्य होईल तशी खरेदी केली जाते. काल परवापर्यंत स्थिर दिसणाऱ्या सोन्या चांदीच्या किंमतीनी आज उसळी घेतली आहे. त्यामुळे आज सोनं-चांदी खरेदी करणार असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील.

परवा (17 March 2021) रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत (Today Gold Price) प्रति 10 ग्रॅम 44 हजार 150 इतकी होती. काल त्यामध्ये कोणताही बदल झाला नव्हता. आज ही किंमत प्रति 10 ग्रॅमला 44 हजार 350 इतकी आहे. तसेच 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत काल 48 हजार 160 इतकी होती. ही किंमत आज 48 हजार 380 इतकी झाली आहे.

चांदीच्या (Today Silver Price) बाबतीत बोलायचं झालं तर 1 किलोग्रॅम चांदीचा दर परवा (17 March 2021) 67 हजार 600 इतका होता. काल हा दर 600 रुपयांनी कमी झाला आहे. काल 1 किलोग्रॅम चांदीची किंमत 67 हजार इतकी होती. आज ही किंमत 67 हजार 700 इतकी पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *