महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२० मार्च । मुंबई ।अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण योग्य प्रकारे हाताळले नसल्याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याची चर्चा माध्यमांत आहे. गृहमंत्री देशमुख यांनी ट्विट करत राजीनाम्याच्या बातम्यांत तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
शुक्रवारी सकाळी अनिल देशमुख यांनी अचानक दिल्लीत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत देशमुख यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे. दिल्लीत पवार साहेबांसोबत झालेली भेट ही विदर्भातील मिहान प्रकल्पाला गती देण्याच्या अनुषंगाने होती. याशिवाय या भेटीत मागील दोन दिवसांत मनसुख हिरेन व सचिन वाझे प्रकरणाविषयी एटीएस व एनआयएने केलेल्या तपासाबाबत चर्चा झाली. माध्यमांत माझ्या राजीनाम्याबाबत ज्या बातम्या दाखविण्यात आल्या त्यात कोणतेही तथ्य नाही, असे देशमुख यांनी म्हटले आहे.