दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी ; परीक्षा ऑफलाईनच होणार, वर्षा गायकवाड यांची घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २० – मुंबई – दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा ऑफलाईन (लेखी परीक्षा) पद्धतीनुसार होणार आहे, अशी महत्वाची माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा ही ठरलेल्या तारखेनुसारच होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळेतही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. (SSC HSC Exam 2021 msbshse Maharashtra exam will be held offline)

🛑दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार
🛑लेखी परीक्षा ही विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेतच होणार
🛑वर्गखोल्या कमी पडल्या बाजूच्या शाळेत बैठक व्यवस्था केली जाणार
🛑यंदा 80 गुणांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटं वाढीव वेळ
🛑40 आणि 50 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं वेळ वाढवून देण्यात येणार
🛑दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येक तासाला 20 मिनिटं
🛑प्रॅक्टिक्ल परीक्षा यंदा असाईनमेंट पद्धतीने
🛑जर विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्यास त्यासाठी विशेष परीक्षेचे आयोजन
🛑विशेष परीक्षा जून महिन्यात घेण्यात येणार

लेखी परीक्षा शाळेतच होणार

कोरोनामुळे हे लेखी परीक्षा ही तुम्ही शिक्षण घेत असलेल्या शाळा किंवा कॉलेजमध्ये परीक्षा घेतली जाईल. जर वर्ग कमी असल्यास इतर शाळेत बैठक व्यवस्था केली जाईल, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.तसेच यंदा 80 गुणांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटं वाढीव वेळ दिला जाणार आहे. तर 40 आणि 50 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं वाढवून दिली जाणार आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येक तासाला 20 मिनिटं वाढवून देणार आहे.दहावीच्या प्रॅक्टिक्ल परीक्षा यंदा असाईनमेंट पद्धतीने घेतल्या जाणार आहे. विशेष म्हणजे हे असाईनमेंट लेखी परीक्षा संपल्यानंतर शाळेत गृहपाठ पद्धतीने द्यायचे आहेत.

10 वी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार

दरम्यान काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता 10 वीची परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार आहे. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12 वीची परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही 16 फेब्रुवारी 2021 पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. (SSC HSC Exam 2021 msbshse Maharashtra exam will be held offline)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *