महाराज साहेब, साहेब आता मुख्यमंत्री होता हेत ; ‘या’ नेत्याची उदयनराजेंशी गळाभेट ;

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २१ – सातारा – आधी पूजा चव्हाण प्रकरण, त्यानंतर सचिन वाझेप्रकरण आणि आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब… यामुळे राज्य सरकारवर संकटाचे ढग दाटलेले असतानाच शिवसेनेकडून निवडणूक लढवलेले नेते आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी अजब विधान केलं आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतर होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. (shiv sena leader narendra patil meet udayanraje bhosale)

शिवसेनेच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवलेले, परंतु आता शिवसेनेत नसलेले माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी हे धक्कादायक विधान केलं आहे. नरेंद्र पाटील हे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना साताऱ्यात रात्री अचानक रस्त्यात भेटले. यावेळी दोघांनीही गळाभेट घेतली. ही गळाभेट घेताना पाटील यांनी जोरजोरात हसत एकच जल्लोष केला. गळाभेट घेत असताना . काळजी नाही आता, असं पाटील म्हणाले. त्यामुळे आजूबाजूला उपस्थित असलेल्यांना एकच धक्का बसला. एवढेच नव्हे तर पाटील यांच्या या विधानाने स्वत: उदयनराजेही दोन मिनिटे चक्रावून गेले. मात्र, असं असलं तरी पाटील यांच्या या विधानामुळे राज्यात सत्तांतर होण्याचे वारे वाहत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

उदयनराजे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक?
खुद्द शिवसेनेच्याच लोकसभेचा उमेदवार राहिलेल्या नेत्याने साहेब मुख्यमंत्री होताहेत काळजी नाही आता, असं उदयनराजेंना उद्देशून म्हटल्याने राज्यात सत्तांतर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच उदयनराजे भोसले हे मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *