‘पॉर्न’ बघणाऱ्या मुलाला त्याच्या कुटुंबियासमेत किम जोंगने ‘ही’ शिक्षा दिली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २३ – उत्तर कोरिया – आपल्या क्रूरतेसाठी आणि विक्षिप्त वागण्यासाठी उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन जगप्रसिद्ध आहे. त्याच्या अशाच एका क्रूरतेची चर्चा आता सध्या जगभरात होत आहे. ‘पॉर्न’ बघणे हा उत्तर कोरियात मोठा गुन्हा आहे. या देशात त्यासाठी कडक शिक्षा दिली जाते.

या देशात एका अल्पवयीन मुलाला काही दिवसांपूर्वी ‘पॉर्न’ फिल्म बघत असताना काही अधिकाऱ्यांनी पकडले. त्यानंतर त्या मुलाला व त्याच्या कुटुंबीयांना थेट उत्तर कोरियातील एका रखरखीत भागात पाठविण्यात आले आहे. त्याचबरोबर त्याच भागात त्यांनी कायमचे राहायचे, असे आदेश देण्यात आले आहेत. या मुलाचे कुटुंब असे एकाएकी बेघर झाल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जात आहेत.

दरम्यान किम जोंगने उत्तर कोरियात कोरोनाचे नियम तोडणाऱ्या आरोपीला सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता. तसेच भांडवलशाहीच्या पडझडीचे प्रतीक म्हणून पाळीव कुत्रे पकडण्याचे आदेश उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यांनी दिले होते. दुसरीकडे, या कुत्र्यांच्या मालकांना भीती आहे की या पाळीव प्राण्याचा वापर देशात चालू असलेल्या अन्न संकटावर मात करण्यासाठी केला जाऊ शकतो. किम जोंग उनने जुलै महिन्याच्या सुरूवातीस पाळीव कुत्री पाळणे हे कायद्याच्या विरोधात असल्याचे घोषित केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *