आज देखील ढगाळ वातावरण ; सलग दोन दिवस ढगांच्या गडगडाटासह पुण्यात आणि पिंपरी चिंचवड पावसाची दमदार हजेरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २३ – पुणे – वरुणराजाने सलग दुसऱ्या दिवशीही पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा दिला. रविवारी पुणे शहराच्या पश्चिम भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या होत्या.पुणे पिंपरी चिंचवड ला सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.

बदलत्या हवामानाचा परिणाम शनिवारपासूनच पुणे शहरात अनुभवायला मिळत आहे. पण सोमवारी सकाळपासून आकाश निळभ्र होते, तसेच उन्हाचा कडाका देखील चांगलाच जाणवत होता. त्यामुळे हवामान विभागाने वर्तविलेला पावसाचा अंदाज खोटा ठरतो कि काय असे चित्र निर्माण झाले होते. पण आकाशात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ढगांची गर्दी जमा झाली आणि काही वेळातच ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. काल अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडालेल्या पुणेकरांनी आज मात्र पावसाचा अंदाज बांधत छत्री, रेनकोट अशा तयारीनिशी घराबाहेर पडलेले पाहायला मिळाले

शहरात रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. आकाशात सायंकाळी ढगांची एकच गर्दी झाली आणि सायंकाळी विजांच्या कडकडाटासह शहराच्या विविध भागात पाऊस पडला होता. त्यात किनारपट्टीपासून मराठवाड्यापर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाऊस होत असल्यामुळे रविवारी शहरातील काही भागात हलक्या तर पश्चिम भागात मात्र पावसाचा जोर अधिक तर मध्य वस्तीत शिडकावा पाहायला मिळाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *