महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २३ – मुंबई – जगभरामध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जातेय. मात्र दुसरीकडे लसीकरण सुरू असल्याने कोरोनावर आपण नक्की मात करू असा दावाही काही तज्ज्ञांकडून आत्मविश्वासाने केला जातोय. अर्थात लसीकरणानंतरही मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. असे असतानाच आता इंग्लंडमधील नागरी आरोग्य विभागाच्या लसीकरण विभागाच्या प्रमुख असणाऱ्या डॉ. मेरी रॅमसे यांनी एक मोठा दावा केलाय. पुढील काही वर्षांसाठी तरी आपल्या सर्वांनाच सोशल डिस्टन्सिंग आणि तोंडावर मास्क घालून फिरावं लागेल, असे डॉ. रॅमसे म्हणाल्या आहेत.