नवी इलेक्ट्रिक बाईक बाजारात ; 1.5 युनिट वीजेवर 100 किलोमीटर धावणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २३ – नवीदिल्ली – दिल्लीमधील इलेक्ट्रिक टू व्हीलर मेकर Komaki ने गेल्या महन्यात इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली होती. त्यानंतर Komaki ने आता इलेक्ट्रिक मोटारसायकल लाँच केली आहे. कोमाकीने नवीन एमएक्स 3 (MX3) इलेक्ट्रिक मोटरसायकल भारतात लाँच केली आहे. कोमाकी एमएक्स 3 ची किंमत 95,000 (एक्स-शोरूम, भारत) आहे.

कंपनीने दावा केला आहे की, ही बाईक पूर्णपणे चार्ज करण्यासाठी 1-1.5 युनिटपेक्षा जास्त उर्जा वापरत नाही आणि एकूणच पेट्रोलवर सुरु असलेल्या खर्चाच्या दृष्टीने ही “पॉकेट फ्रेंडली” बाईक आहे. तसेच ही बाईक सिंगल चार्जवर 85-100 किमी धावेल. ही रेंज तुमच्या रायडिंग स्टाईलवर अवलंबून आहे. याचाच अर्थ 1 ते 1.5 युनीट वीजेवर ही बाईक तब्बल 85 ते 100 किलोमीटर धावते.या बाईकची बॅटरी सोयीस्करपणे चार्ज करता यावी, यासाठी यामध्ये रीमुव्हेबल Li-ion बॅटरी देण्यात आली आहे. गार्नेट रेड, डीप ब्लू आणि जेट ब्लॅक या तीन पेंट स्कीम्ससह ही बाईक सादर करण्यात आली आहे.

Komaki MX3 अनेक अत्याधुनिक सुविधांसह सादर करण्यात आली आहे, ज्यामध्ये सेल्फ डायगनॉसिस अँड रिपेयर स्विच, रिजेनरेटिव्ह डुअल डिस्क ब्रेकिंग, पार्किंग आणि रिव्हर्स असिस्ट, एक इनबिल्ट ब्लूटूथ स्पीकर, 3-स्पीड मोड आणि एक फुल कलर LED डॅशचा समावेश आहे.
या बाईकमधील यांत्रिकी घटकांबद्दल (मेकॅनिकल कम्पोनंट्स) बोलायचे झाल्यास, यामध्ये 17-इंचाचे अ‍ॅलोय व्हील्स, टेलीस्कोपिक शॉक अ‍ॅब्सॉर्बर, अलोय व्हील्स आणि डिस्क ब्रेक आहेत, तर फ्रंट हेडलॅम्प्स आणि टेल लॅम्पवर हॅलोजन, ब्लिंकर आणि एलईडी युनिट देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *