महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी- पिंपरी (दि. 23 मार्च 2021) पिंपरी चिंचवड शहरातील व्यापा-यांच्या अनेक समस्या आहेत. पिंपरी कॅंम्पमधील व्यापा-यांचा पी – 1 आणि पी – 2 अशा पार्किंग पध्दतीस विरोध आहे. हा विरोध रास्त आहे. त्यासाठी आपण सर्व व्यापा-यांची बैठक पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्त यांच्याबरोबर लवकरच घेऊन या विषयावर मार्ग काढू असे प्रतिपादन आमदार आण्णा बनसोडे यांनी केले.
रविवारी पिंपरी चिंचवड शहरातील सतरा व्यापारी संघटनांची बैठक पिंपरी कँम्पमध्ये घेण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक डब्बू आसवाणी, शितल शिंदे, निकीता कदम आणि बहुतांशी व्यापारी बंधू उपस्थित होते. यावेळी उद्योजक श्रीचंद आसवाणी यांची पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनच्या अध्यक्षपदावर सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी आमदार बनसोडे यांनी श्रीचंद आसवाणी यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले. डब्बू आसवाणी, शितल शिंदे, धनराज आसवाणी यांची देखिल व्यापा-यांच्या समस्या बैठकीत मांडल्या. आण्णा बनसोडे यांनी पदपथावरील अतिक्रमणे काढण्याबाबत व्यापा-यांना आवाहन केले.