महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २४ – पुणे – सलग ५ दिवस सोन्याच्या किंमतीत (today Gold Rate) घट झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण होतं. आज तर सोन्याचा दर कालच्यापेक्षाही कमी पाहायला मिळतोय. त्यामुळे सोने खरेदी करण्याची इच्छा असणारे आजचा मुहूर्त देखील शोधू शकतात.
गुड रिटर्न वेबसाईटनुसार २२ कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत काल ४३,००० रुपये होती. आज ही किंमत कमी होऊन ४२, ९९० इतकी झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची कालची किंमत ४४,००० रुपये इतकी होती. आज यामध्ये 10 रुपयांनी घट झालीय. आज हा दर ४३९९० वर येऊन पोहोचलाय.
चांदीच्या दरातही (Today Silver Rate) घट नोंदवण्यात आलीय. काल एक किलो चांदीचा दर ६६००० इतका होता. आज यामध्ये ७०० रुपयांची घट नोंदवण्यात आलीय. हा दर आता ६५३०० इतका झाला आहे.