महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २५ – मुंबई – गेल्या वर्षभरापासून सतत वाढत असणाऱया पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीला बुधवारी एकदा ब्रेक लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमतीत घट झाल्याने देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीदेखील घसरल्या असून पेट्रोल 18 पैशांनी तर डिझेल 17 पैशांनी स्वस्त झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागल्याने गेल्या वर्षभरातील पेट्रोल आणि डिझेलचे सर्वात कमी दर आता नोंदविण्यात आले आहेत.
या घसरणीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किंमत प्रति लिटर 91.17 रुपयांवरून थेट 90.99 रुपयांवर पोहचली आहे. तर डिझेलची किंमत 81.30 रुपये इतकी नोंदविण्यात आली आहे. याअगोदर ही किंमत 81.47 प्रति लिटर इतकी होती. तर मुंबईत पेट्रोलची किंमत 97.40 रुपये प्रति लिटर इतकी नोंदविण्यात आली असून डिझेलची किंमत 88.42 रुपये प्रति लिटरवर पोहचली आहे.